Disha Shakti

Uncategorized

उद्या कोपरगावात हिंदू जन आक्रोश मोर्चा ; पाऊस आला तरी मोर्चा होणारच- सुरेशजी चव्हाणके

Spread the love

प्रतिनिधी / जितू शिंदे : कोपरगाव शहरातील एका हिंदू मुलीला लव्ह जिहादचे षडयंत्र रचून तिच्यावर अत्याचार करून तिचे धर्मांतरण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे कोपरगाव येथील हिंदूंमध्ये जनक्षोभ निर्माण झाला आहे.त्यामुळे 20 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वा. भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.मोर्चात लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी करण्यात येणार आहे.हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,कोपरगाव येथून निघणार आहे. या मोर्चाला सुदर्शन न्युजचे मुख्य संपादक तथा हिंदू धर्मयोद्धा सुरेशजी चव्हाणके हे प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

पाऊस आला तरी मोर्चा होणारच असे त्यांनी काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळावर उतरल्यावर घोषित केले. संगमनेर सारखाच भव्य-दिव्य मोर्चा कोपरगावचा असणार आहे. तरी सर्व बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!