Disha Shakti

Uncategorized

तेरसह परिसरात पाऊसाची हजेरी सोयाबीन सह इतर पिकांना दिलासा

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे :- धाराशिव तालुक्यातील तेर येथे     गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडिप दिल्याने सोयाबीन सह खरीप पिके माना टाकू लागले होते  पावसाने  सोमवारी राञी व मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस तेरसह परिसरात दमदार हजेरी लावल्याने शेती शिवारात पिकांच्या गरजेपुरता ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेरसह, किणी, कोळेवाडी, वाणेवाडी, डकवाडी, मुळेवाडी, थोडसरवाड, तुगाव, परिसरातील शेतकऱ्यांनी आगामी काळातील पावसाच्या भरवशावर खरिप हंगामातील पेरणी केली असून अनेक शेतकरी पेरणी करत आहेत परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने तेरसह परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते विशेष म्हणजे पावसाळ्यातही उन्हाळ्याप्रमाणे उन्हाची तीव्रता वाढत असल्याने खरिप हंगामात पेरणी केलेल्या व सध्या स्थितीत पिके उगवून आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याअभावी सुकू लागल्याचे चित्र तेरसह परिसरात दिसून येत होते .

तसेच शेतकऱ्यांनी पिके जगवण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घेतला होता त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत पाऊस पडला नाही तर पेरणी केलेल्या व सध्याच्या स्थितीत बियाणे उगवून आलेल्या शेतकऱ्यांवर पाण्याअभावी पिके सुकून गेल्यामुळे पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावण्याची शक्यता होती परंतु मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने तेरसह परिसरातील शेती शिवारात पाणी झाले त्यामुळे खरिप हंगामातील पीकाना चांगलाच दिलासा मिळाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!