राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : आज २० जुलै रोजी वेळ दुपारी 1 ते 2 या वेळेत राहुरी येथील नामांकित बालविद्या मंदिर प्रशाला राहुरी या शाळेत इयत्ता पहिली अ चा पालक मेळावा संपन्न झाला. या पालक मेळाव्यामध्ये पहिली अ चे वर्गशिक्षक श्री.राठोड सर यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनीना अभ्यास कसा करावा हे एकदम सोप्या आणि सरळ शब्दात सांगितले व पालकांना पण मार्गदर्शन करताना सांगितले मुलांचा घरी पण शुध्दलेखन,वाचन, लेखन घरी कसे करुन घ्यावे ते सांगितले. तसेच आज सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीना स्पोर्ट ड्रेस चे वाटप वर्गशिक्षक व पालक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी बरोबर पालकांची संख्या भरपूर होती.व मिटींग वेळेत संपन्न झाली.सर्व पालकांनी वर्गशिक्षकांचे आभार मानले व पालक मेळावा संपन्न झाला.
Leave a reply