धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : जागृती फाउंडेशन’ ही संस्था मासिक पाळीच्या उच्च काळातील स्वच्छतेसंबंधी काम करते. स्त्रि तज्ञयांमध्ये स्वत:कडे,स्वतःच्या शरीराकडे आणि शरीरधर्माकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची प्रेरणा या कामामागे आहे. तुळजाई प्रतिष्ठान संचालित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह आळणी जि. उस्मानाबाद येथे जागृती फौंडेशनच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वआधार बालगृहातील मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
या बालगृहात एकुण 113 मुलींचे वास्तव्य आहे. त्या मधील 96 किशोरवयीन मुलींना मासिक पाळी येते. मागील 4 वर्षापूर्वी लातुरचे माहेर असलेल्या सौ.स्वानंदी देशमुख-रथ पुण्यामध्ये जागृती फौंडेशनची स्थापना केली. त्या लातुरच्या माहेरवाशिणी असल्याने आपल्या भागात कोणी मुलींप्रती काम कारणारा एखाद्या प्रकल्प शोधत त्यांनी स्वआधार मातिमंद मुलींचा निवासी प्रकल्पा चा शोध घेऊन संपर्क साधला व प्रकल्पातील कामाचा आढावा घेतला व आपन ह्या मुलींन सोबत आपला उपक्रम राबवण्याचा निर्धार केला .तसेच त्या गरजु महिला साठी नवनवीन उपक्रम राबवतात.
जागृती फौंडेशन हे पुणे येथील महिलांसाठी निरनिराळ्या सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. महिलांसाठी महिला दिन, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, अपंग दिन अशा दिनानिमित्त नवनवीन उपक्रम राबवतात. तसेच त्यांना स्वआधार मातिमंद मुलींचे बालगृह येथील संस्थेचे मुलींप्रती काम पाहुन त्यांनी गेले 3 ते 4 वर्षीपासून जागृती फौंडेशनच्या माध्यमातून बालगृहातील किशोरवयीन 96 मुलींना मासिक पाळी येते. त्या मुलींना व महिलांना जागृती फौंडेशनच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात येते.आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बालगृहातील मुलींना सौ. स्नेहप्रभा चंद्रभूषण सिंह राजपूत यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.
या नॅपकिनचे वाटप करण्याचे काम पुढे ही चालू राहणार असल्याचे सौ.स्वानंदी देशमुख-रथ यांनी सांगितले. श्री. कुणालजी गांधी यांचे मोलाचे सहकार्य लाभते. स्वआधार प्रकल्पाचे संचालक मा. श्री. शहाजी चव्हाण तसेच मुख्याध्यापक श्री. गुरूनाथ थोडसरे व सर्व महिला कर्मचारी यांनी जागृती फौंडेशन तसेच सौ.स्वानंदी देशमुख-रथ यांचे व त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानले..
जागृती फाउंडेशच्या वतीने 76व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वआधार मातिमंद मुलींचा निवासी प्रकल्पामध्ये पॅडचे वाटप करण्यात आले

0Share
Leave a reply