Disha Shakti

Uncategorized

दक्षिणेच्या मैदानात गडाख-विखे पुन्हा एकदा लढत ? : पवार – ठाकरेंच्या नेतृत्वात रणनितीची आखणी

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असताना नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतील चाचपणीला महाविकास आघाडी म्हणजेच भाजपविरुध्द एकत्र आलेल्या वारोधी पक्ष्यांच्या इंडिया आघाडीने वेग दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाने नगर जिल्हा केंद्रस्थानी ठेवला आहे. लोकसभेला शिर्डी आणि नगर दक्षिणेतून उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यानंतर नगर दक्षिणेतून जिल्ह्यात तगडे राजकीय वर्चस्व असलेले गडाख परिवारातील शंकरराव गडाख यांची उमेदवारीची तयारी केली आहे. यासाठी आघाडीतील वरिष्ठ नेत्यांसोबत गडाखांच्या उमेदवारीची चर्चा झाली आहे. यशवंतराव गडाख यांच्या सोबत अंतिम चर्चा होऊन पुढील रणनीती तयार करण्याचे ठरले आहे.

१९९१ मध्ये न्यायालयीन लढाईमुळे दिवंगत बाळासाहेब विखे विरुद्ध यशवंतराव गडाख ही लढत देशात गाजली. यात शरद पवारांनाही ओढले गेल्याने पवार-विखे राजकीय वैर तयार झाले ते अद्यापही कायम आहे. त्यामुळेच बद्दलत्या राजकीय घडामोडीत शंकरराव गडाखांच्या उमेदवारीला ते सकारात्मक असतील, जोडीला सोयरे-धायरे राजकारण आणि विखेंना राजकीय परंपरागत विरोध या त्रिवेणी योगातून बाळासाहेब थोरात हे गडाखांसाठी अनुकूल असतील. शंकरराव गडाखांच्या नावावर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात चर्चा झाली आहे. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांची मोठी भूमिका असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार निलेश लंके यांना २०२४ साठी अनुकूलता होती. त्यांनी खासदार सुजय विखे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केल्याचे चित्र असतानाच राष्ट्रवादी मधील फुटीत लंके अजित पवार यांच्या सोबत आहेत. तर काॅंग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे येत आहे. पण खुद्द थोरात याबद्दल बोलत नसल्याने त्यांची उमेदवारी अनिश्चित अशीच आहे.या परिस्थितीत खासदार डॉ. सुजय विखेंना तोडीसतोड आव्हान गडाख कुटुंबाकडून दिले जाऊ शकते आणि त्याला शरद पवार – बाळासाहेब थोरात यांची सहमती असेल असे बोलले जात आहे.

आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षाच्या उध्दव ठाकरेंच्या कारकिर्दीत नंतर दोन राजकीय भूकंप झाले. त्याचे पडसाद आता २०२४ च्या लोकसभा – विधानसभा निवडणुकीत निश्चित दिसणार आहे. असाच धक्का आता अहमदनगर दक्षिण लोकसभेला मतदारांसमोर येत असुन सुजय विखे यांच्या विरोधात उध्दव ठाकरेंनी शंकरराव गडाख यांना उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.

तर इतिहासाची पुनरावृत्ती….

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ १९९१ च्या लोकसभा निवडणुकीतील विखे – गडाख लढतीमुळे देशभर चर्चेत आला. आज ३० वर्षांनंतरही या मतदारसंघाची चर्चा निघाली की बाळासाहेब विखे पाटील विरूद्ध यशवंतराव गडाख यांच्यातील लढत व त्यानंतरचा आचारसंहितेचा भंग खटला आठवला जातो. सध्या भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील या मतदारसंघातून खासदार आहेत. या दोन्ही परिवारातील नव्या पिढीने राजकीय कटुता मागे सोडत संवाद स्थापित केला आहे. मात्र ठाकरे गटाच्या मनसुब्यानुसार महाविकास आघाडीकडून माजी मंत्री शंकरराव गडाखांना मैदानात उतरवल्यास पुन्हा एकदा विखे – गडाख सामना पाहण्यास मिळणार का, हा प्रश्न चर्चेत आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!