Disha Shakti

सामाजिक

नांदगाव तहसील कार्यालयावर धनगर समाजाचा आक्रोश मोर्चा ; धनगर समाजाचा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा

Spread the love

नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नांदगाव तहसील कार्यालयावर समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील शनी मंदिर ते तहसील कार्यालय असा मार्गस्थ मोर्चा थेट तहसील कार्यालय येथे पोहोचला.

धनगर समाजाची एसटी प्रवर्गात आरक्षण अंमलबजावणी करावी, तसेच धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.या मागण्यासाठी नांदगाव तालुक्यातील पंचक्रोशीतील सकल धनगर समाज बांधवांनी आक्रोश मोर्चा काढत संबळ /सनई या आपल्या पारंपारिक वाद्याच्या गजरात येळकोट – येळकोट जय मल्हार च्या गर्जना देत, या आक्रोश आंदोलन मोर्चात मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाला होता.

यावेळी तालुक्यातील पक्ष- संघटनांनी मोर्चा/ मागण्यासाठी पाठिंबा दर्शवला समाज कार्यकर्त्यांनी आपल्या समाजाच्या व्यथा मांडत, अनेक वर्षापासून आश्वासने देत सरकारने वेळोवेळी समाजाला हक्काच्या लाभांपासून वंचित ठेवत, फसवणूक करत, दिशाभूल केली. आता धनगर समाज जागा झाला आहे. सरकारने झोपेचे सोग घेऊ नये. ” धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे” धनगर समाजासाठी लागू असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा त्वरित लाभ द्या.

आमच्या मागण्या प्रती आम्ही ठाम आहोत. सरकारने दखल न घेतल्यास राज्यात पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल असा रोष या ठिकाणी व्यक्त करत, यावेळी तहसील कार्यालय येथे अधिकाऱ्यांना सकल धनगर समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!