विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : नवरात्री आरंभ निमित्त शहरातील संस्कृती व परंपरा जोपासण्याकरिता जय श्रीराम प्रतिष्ठाणच्या वतीने, महान तपस्वी बालयोगी परमहंस महेश्वरानंद गिरीजी महाराज ( हरियाणा ) यांची, शहरातील छ.शिवाजी महाराज रोड व मेन रोड मार्गे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोभा यात्रेतील पारंपरिक ढोल ताश्यांची जुगलबंदी तसेच मर्दानी चित्त थरारक खेळांनी शहर वासीयांचे लक्ष वेधून घेतले. महान तपस्वी महाराज्यांच्या शोभा यात्रेचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे,महिला आघाडीच्या पूजा चव्हाण, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल,आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. जय श्रीराम प्रतिष्ठाणने काढलेल्या या पारंपरिक मिरवणुकीचे शहरातील नागरिकांसह, व्यापारी वर्गातुन कौतुक केले जात आहे. या शोभा यात्रेस भाजपा पदाधिका-यांसह शहरातील महिला,पुरुष, युवक युवतींसह मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
Leave a reply