Disha Shakti

क्राईम

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न..

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : दि.१९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३०.च्या दरम्यान जेवण करून परत येत असताना राहुरी कॉलेज रोडला पल्सर वर तोंड बांधून आलेल्या दोन जणांनी पिंटू नाना साळवे यांना गाडी अडवून ” नाना गलांडे”च्या विरोधात जाऊन आंदोलन करतोस काय? तुला बघतो.. Υफक्त त्यांचा जामीन होऊ दे..असे म्हणून गाडीला लाथ मारली व निघून गेले.

त्या अज्ञात व्यक्तिविरोधात राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून या सगळ्या घटनेमागचा मास्टर माईंड नाना गलांडे याची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी महेश साळवे वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष यांनी केली आहे.

या घटनेचा निषेध म्हणून उद्या नगर येथे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी सांगितले आहे. सर्व थरातून या घटनेचा निषेध केला जात असून नाना गलांडे याला तात्पुरता जामीन असून त्याचा जामीन रद्द व्हावा ही समाजातून मागणी होत आहे..


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!