Disha Shakti

सामाजिक

जीवात जीव असेपर्यंत अपंग सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणार -निर्मला राऊत*.

Spread the love

दौंड प्रतिनिधी किरण थोरात

दौंड: सहजपूर येथे आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक २४/१०/२०२३ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता सौ. निर्मला महादेव राऊत(महिला अध्यक्ष-प्रहार दिव्यांग क्रांती संघटना दौंड तालुका) व युवक कार्यकर्ते विजय  महादेव राऊत यांनी नोकरी करून समाजाचे काहीतरी लागतो ही भावना ठेवून अपंगाना १०० ब्लॅंकेट वाटप आणि स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न करण्यात आला होता

सदर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब नानवर ,सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे, माजी उपसभापती सुशांत दरेकर, माजी सरपंच मीनाक्षीताई म्हेत्रे,दौंड मार्केट कमिटी संचालक जीवन म्हेञे, माजी सरपंच चांगदेव म्हेत्रे, उपसरपंच रोहित म्हेञे प्रदीप गायकवाड, माजी सरपंच निलेश म्हेत्रे,रामदास बोराटे,महेश म्हेञे, प्रदीप म्हेञे, दादासाहेब बागडे,गणेश म्हेञे, आबा थोरात तसेच भरपूर मान्यवर आणि बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात १०० लोकांना ब्लॅंकेट वाटप आणि स्नेहभोजन करण्यात आले होते. *निर्मला राऊत म्हणाल्या-मी प्रहार संघटनेत काम करते मी तालुक्यात फिरते त्यावेळी भरपूर अपंग बांधवांच्या हाल,अपेष्ठा मला बघवत नव्हत्या तसेच माझी मुलगी 80-90 टक्के अपंग आहे तरीही माझे मिस्टर महादेव राऊत, मुलगा विजय राऊत यांच्यासह चर्चा करून आपणही दसऱ्याच्या दिवशी १००ते१२५ अपंग लोकांना ब्लॅंकेट वाटप करू असे ठरले आणि आमंत्रण देऊन अपंगाना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले होते* *उमेश म्हेञे म्हणाले*-निर्मला राऊत यांच्या ध्येयशक्तीचे सहजपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहेत कारण राऊतताई अपंग मुलीला सांभाळण्यासाठी घरीच असतात, महादेव व विजय सरकारी नोकरीत नसताना तोकड्या पगारावर काम करतात तरीपण अपंग समाजाचे कायतरी देणे लागतो या भावनेतून घरात चर्चा करून 100 लोकांना ब्लॅंकेट वाटण्याचे ठरवून दसऱ्याच्या मुहूर्तावर अपंगाना पुढाऱ्यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात आले होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!