धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : प्रति वर्षाप्रमाणे संत गोरोबा काकांचा वार्षिक पायी पालखी सोहळा कार्तिकी एकादशीसाठी तेर येथुन बुधवार दि . 15 नोव्हेंबर रोजी तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, दत्तात्रय मुळे, निरीक्षक नळणीकर यांच्या उपस्थितीत” टाळ , मृदंग आणि ज्ञानोबा -तुकोबाच्या हरी नामाच्या गजरात भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे .
हा पालखी सोहळा हिंगळजवाडी , धाराशिव, भातंबरे ,वैराग , यावली , खैराव, अनगर , रोपळे येथे मुक्कामी थांबून गुरुवार दि. 23 नोव्हेंबर रोजी पहाटे पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तिरावर दाखल होणार आहे . कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानंतर पंढरपूरातील मुक्काम संपवून सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने परतिचा प्रवास करणार आहे .
परतीचा प्रवास येवती , खंडोबाचीवाडी , कुंभेज , कापसेवाडी , काळेगाव , साकत , पिंपरी , कौडगाव , सांजा , काजळा , मार्गे मजल दर मजल करत दिनांक 6 डिसेंबर रोजी सोहळ्याचे तेर नगरीत आगमन होणार आहे. या पायी पालखी सोहळ्यात मुक्काच्या ठिकाणी नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.
यावेळी तुळजापुर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील , निरीक्षक नळणीकर, मंदिराची पुजारी हभप रघुनंदन पुजारी, रचना कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे,नागनाथ कुंभार, प्रशांत वाघ , पद्माकर फंड , उपसरपंच श्रीमंत फंड , नाना भक्ते, राम देशमुख, प्रवीण साळुंखे यांचीही उपस्थिती होती.
Leave a reply