Disha Shakti

सामाजिक

श्री.सिध्दीविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सहकार्याने बसविले स्पिड ब्रेकर

Spread the love

मुंबई कांदिवली / भारत कवितके : मुंबई कांदिवली पश्चिम येथील के.डी.कंपाऊंड, गांधी नगर, या ठिकाणी कार्यरत असलेल्या श्री सिध्दीविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था च्या सहकार्याने कार्यालयाच्या समोर असलेल्या रस्त्यावर स्पिड ब्रेकर बनविण्यात आला आहे.या ठिकाणी रस्त्यावर बाईक स्वार बेभान पणे वेगाने बाईक चालवित असत त्यामुळे येथे लहान कुत्रे मांजर लहान मुले, यांना अपघात होऊन दुखापत झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, तसेच महिला, वयोवृद्ध व्यक्ती यांना ही येथील वेगाने चालविणाऱ्या बाईक स्वारामुळे दुखापत झाल्याचे दिसून आले आहे.

बाईक स्वारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते,या गोष्टी चा येथे कार्यरत असलेल्या श्री सिध्दीविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी सभासद सदस्य यांनी सहकार्य करुन तेथे स्पिड ब्रेकर बनविण्यात आले आहेत.या बाबत येथील रहिवासी बांधवांनी संस्थेचे मनापासून आभार मानले व धन्यवाद दिले.संस्थेचे अध्यक्ष विजय पाल, कुमार सुगावे, प्रविण पाल, महासचिव भारत कवितके यांचे विशेष आभार मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!