Disha Shakti

क्राईम

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 32 गोवंश जातीचे वासरांना जीवदान,सहा लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त एक आरोपी ताब्यात, डी.वाय.एस.पी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / गणेश राशीनकर : दि. 25/11/2023 रोजी डी वाय एस पी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, ममदापूर शिवारात तालुका राहाता येथील अनिल उंडे यांच्या शेत जमिनीत एका पांढरे रंगाचे मॅक्स पिकप गाडीमध्ये कत्तली करीता गोवंश जातीचे जनावरे आणले आहेत . त्याबाबत आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी ममदापूर गावातील सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असतं सदर शेतामध्ये एक पांढरे रंगाचे पिकप व त्यामध्ये गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरलेले ओरडताना मिळून आले व पिकप मधील व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव सुफियान मेहबूब कुरेशी राहणार ममदापूर तालुका राहताअसे सांगितले.

सुफियान मेहबूब कुरेशी याच्या ताब्यातील पिकप वाहनाची पाहणी करता त्यामध्ये गोवंश जातीचे 32 जनावरे मिळून आले त्यांचे समोर चारा पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय न करता उपाशी ठेवून कत्तली करिता एकत्र पिकप वाहनांमध्ये जमा करून ठेवले म्हणून सदर इसमास व पिकप मधील गोवंश जातीचे जनावरासह असा एकूण सहा लाख तीस हजार रुपये चा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 685/ 2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 (सुधारित 2015) चे कलम 5(अ).5(क). 9(अ)9(ब) सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960चेकलम 11(च)(ज) पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे यांचे फिर्यादी वरून लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक शिंदे, असीर सय्यद, पोलीस नाईक राशिनकर पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे , पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र इंगळे,  पोलीस हेडकॉन्स्टेबल थोरमिसे यांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!