राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची अहमदनगर कंट्रोलला बदली करण्यात आली असून उंबरे येथील राष्ट्रीय बाल हक्क आयोगाला चौकशीसाठी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांची तात्पुरती स्वरुपात अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली केली आहे.उंबरे येथील गुन्ह्यायाच्या अनुषंगाने पोलीसांच्या भुमीकेबाबत राष्ट्रीय बाल अधिकार, संरक्षण आयोगाने नाराजी व्यक्त केली असून त्याबाबत आयोगाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चौकशी प्रकिया सुरू असल्याने पोलिस निरीक्षक धनंजय जाधव प्रभारी अधिकारी राहुरी पोलिस स्टेशन यांना तेथे कार्यरत ठेवणे न्यायोचित होणार नसल्याने विशेष पोलीस निरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचेकडील संदर्भ क्र.4 अन्वये पोलिस निरीक्षक धनंजय अनंतराव जाधव यांची पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरता स्वरुपात पोलिस नियंत्रण कक्ष अहमदनगर येथे नेमणूक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक जाधव यांची सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून त्यांच्याशी सुसंवाद साधत आपली वेगळी छाप पाडली होती.अनेक गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने करून गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना त्यांची नगर कंट्रोलला बदली झाल्याने पुन्हा एकदा राहुरीत गुन्हेगारी डोके वर काढणार असल्याचे बोलले जात आहे.
Leave a reply