Disha Shakti

क्राईम

जमावाच्या हाणामारीत सुगावचा सीरियल किलर अण्णा वैद्यचा मृत्यू

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार  : संपुर्ण राज्यात गाजलेल्या सुगाव खुर्द येथिल महिला हत्याकांडातील मुख्य आरोपी अण्णा वैद्य यांचा काल रात्री संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यु झाला. सुगाव खुर्द येथे घडलेल्या घटनेत आरोपी वैद्य याने एका अल्पवयीन मुलीला जबर मारहाण करत तिची छेड काढल्याचे समोर आले आहे. त्यावरूनच संतप्त झालेल्या जमावाने त्याला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली.

संबंधित पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादित म्हटले की, मी सातवीत शिकत आहे. आज रविवारची सुटी असल्याने दुपारी मैत्रिणीकडे जात होते. त्याचवेळी अण्णा वैद्य हा त्याच्या घरासमोर उभा होता. मला पाहताच त्याने ए पोरी इकडे ये म्हणून हाक मारली. मग मी घाबरल्याने लगेच घरी पळत जात होते. त्याचवेळी अण्णा माझ्यामागे येत असल्याचे दिसले. मग मी घरात गेल्यावर आतून कडी लावून आत बसले. हे पाहून अण्णा वैद्य दरवाजा लाथा मारून तोडत होता.

दरवाजा तोडून तो घरात येताच तू बोलावले तर का आली नाहीस असे म्हणत माझे केस धरून मला घराबाहेर काढले. तसेच मला जोराने मारहाण केली. व एका खांबावर ढकलून दिले. त्यावेळी माझ्या डोक्याला आणि मानेला मार लागला.मला सोडविण्यासाठी माझे नातेवाईक आले तर त्यांनाही मारण्याचा दम दिला. मला फाशी देण्याची धमकी देऊन माझ्याशी असभ्य वर्तन केले. हे पाहून गावातील काही माणसं गोळा झाली. त्यातील काहींनी मला कसेबसे सोडविले.

यावरून अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे एका समाजाचा जमाव संतप्त झाला. या जमावाने अण्णा वैद्य यास जबर मारहाण केली. त्यानंतर जखमी अण्णाला सुरूवातीला अकोलेतील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. तेथून संगमनेर येथील एका रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना काल रात्री  9 वाजता मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असुन आज होणार्‍या शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे.

राज्यात गाजलेल्या सुगाव खुर्द येथिल महिला हत्याकांडात अण्णा वैद्य मुख्य आरोपी हाता पाण सबळ पुराव्या अभावी त्याची निर्दोश मुक्तता केली होती.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!