इंदापूर तालुका / प्रतिनिधी प्रविण वाघमोडे : रा.प. इंदापूर आगार, पुणे विभाग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सडक सुरक्षा, जीवन रक्षा सुरक्षितता अभियान अंतर्गत सुरक्षितता मोहीम पंधरवडाचे उद्घाटन मा. डॉ श्री अविनाश पाणबुडे एम डी मेडीसिन ( मानसेवी वैद्यकीय अधिकारी ) यांच्य शुभहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी श्री.अकोलकर पालक अधिकारी, इंदापूर आगार, आगार व्यवस्थापक श्री.हनुमंत गोसावी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री परशुराम भोसले, लेखाकार श्री.रवींद्र डोके व श्री तौसिफ शेख इंदापूर हे उपस्थित होते. तसेच आगाराचे चालक, वाहक व यांत्रिक तसेच प्रशासकीय कर्मचारी हे हजर होते. श्री तौसीफ शेख यांनी सुरक्षितता अभियानाची प्रस्तावना केली.
यावेळी डॉ.पाणबुडे साहेब यांनी रा.प. महा मंडळाच्या चालकांवर आजही विश्वासाने प्रवाशी हे प्रवास करत असतात. तसेच सर्व कर्मचारी यांनी आपले शारीरिक आरोग्य जपावे असा मोलाचा सल्ला डॉक्टर पाणबुडे यांनी कर्मचाऱ्यांना सदर कार्यक्रमा वेळी दिला. श्री हनुमंत गोसावी आगार व्यवस्थापक यांनी चालकांना सुरक्षित वाहन चालविणे बाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्री परशुराम भोसले यांनी अपघात झाल्याने आर्थिक स्वरूपात तसेच जीवित स्वरूपात असे नुकसान होते त्यामुळे जबाबदारी पूर्वक वाहन चालवावे असे चालकांना सांगितले. श्री हनुमंत गोसावी आगार व्यवस्थापक इंदापूर यांनी प्रमुख पाहुण्याचे आभार मानले. श्री तौसीफ शेख यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
राज्य परिवहन मंडळ इंदापूर आगाराच्यावतीने पुणे येथे सडक सुरक्षा, जीवन रक्षा सुरक्षितता अभियान मोहिमेअंतर्गत पंधरवडाचे उद्घाटन

0Share
Leave a reply