विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : अयोध्येत सोमवारी (ता. २२) प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील मांसाहरी आणि मद्य दुकाने बंद ठेवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असताना नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर ) येथे एक दिवस मटन, चिकन, चायनीज, तसेच देशी व विदेशी मद्य व्यवसाय विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय श्री ढोकेश्वर सैनिक फाउंडेशनने घेतला आहे.
सैनिक फाउंडेशनचे जेष्ठ मार्गदर्शक बबनराव खिलारी, अध्यक्ष दिगंबर शेळके, उपाध्यक्ष विक्रम बांडे, सचिव संजय खिलारी, ज्ञानदेव पायमोडे, संजय पायमोडे, शिवाजी पायमोडे मेजर यांनी तशा आशयाचे पत्र ग्रामपंचायत टाकळी ढोकश्वर व सर्व विक्रेत्यांना, तशी विनंती केली. तसा विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला संमती दिली.
टाकळीढोकश्वर मांस विक्रेत्यांच्या या निर्णयाचे टाकळीढोकश्वर परिसरातून कौतुक होत आहे.
अयोध्या राम मंदिराचे लोकार्पण, श्री ढोकेश्वर सैनिक फाउंडेशनचा मोठा निर्णय, एक दिवस मटन चिकन चायनीज तसेच देशी व विदेशी मद्य व्यवसाय विक्री बंद ठेवा

0Share
Leave a reply