सटाणा प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल, सटाणा या शाळेत प्रभू श्रीरामचंद्राचे अयोध्या नगरीत ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या वर्षात लहान चिमुकल्यांनी स्वागत केले. या शाळेपासून सटाणा शहरातील काही भागात श्रीरामचंद्राच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यात इयत्ता नर्सरी ते चौथीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले. मिरवणूक जात असताना अनेक महिलांनी पालखीची पूजा केली. यशवंतराव महाराजांची सटाणा नगरी आनंदाने दुमदुमली.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.वैशाली सोनवणे यांनी श्री.प्रभू रामचंद्राच्या वेशभूषेत आलेला सिनियर के.जी.चा विद्यार्थी मयंक सोनवणे, लक्ष्मणाच्या वेशभूषेत आलेला जुनिअर के.जी. चा विद्यार्थी विघ्नेश जोशी, सीतेच्या वेशभूषेत आलेली सिनियर के.जी. ची विद्यार्थिनी काव्या बोरसे, व शबरीची भूमिका पार पाडणारी सिनियर के.जी.ची विद्यार्थिनी रुचिता गवळी, तसेच जुनिअर के.जी चा विद्यार्थी कुबेर सूर्यवंशी हा हनुमान च्या वेशभूषेत आलेला होता.
या सर्वांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच इयत्ता नर्सरी ते सिनियर के.जी. चे सर्व विद्यार्थी विविध वेशभूषेत आले होते. अशाप्रकारे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्वांचे ढोल ताशाच्या गजरात फुलांच्या वर्षावाने स्वागत केले. या निमित्ताने शाळेत सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या व पताका लावण्यात आल्या. झेंडूच्या फुलांच्या माळा, आकाश कंदील तसेच दिवे प्रज्वलित करण्यात आले. शबरीची कुटी तयार करण्यात आली. प्रभू श्रीराम चंद्राच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्वांनी श्रीरामांची आरती केली.
प्रभू श्रीरामचंद्राची माहिती शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बोरसे योगेश यांनी सांगितली. तसेच संपूर्ण अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचे विवरण व विश्वभरातील रामभक्तांना निवेदन शाळेतील शिक्षका वैशाली सावंत यांनी दिले.या संपूर्ण अयोध्येचे आयोजन शाळेतील शिक्षिका श्रीम.पुनम विरगावकर, अहिरे माधुरी व निकिता भामरे यांनी भरपूर परिश्रम घेऊन उत्कृष्ट पद्धतीने केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक श्रीम.महाले अश्विनी, कदम सारिका, अहिरे हर्षिता, कुवर रुपाली, भामरे जयश्री, सावंत वैशाली, निकम श्रद्धा, सोनवणे दिपाली, देवरे वैशाली, जाधव अर्चना, सोनवणे विनय, जाधव दिपक, वाघ अविनाश, अहिरे दिनेश, बोरसे योगेश, उमेश देवरे, देवरे प्रियंका, कल्याणी सोनवणे, भामरे सपना, जाधव मोनिका व शाळेतील क्लर्क बिरारी भाऊसाहेब तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी प्रविण कोर, रोहिदास सोनवणे, नरेंद्र अहिरे, निलेश थोरात, पवन पवार, जाधव अंजना, निकम ललिता, जाधव सोनाली, अमोल सोनवणे या सर्वांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखून कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडला.
Leave a reply