Disha Shakti

ई-पेपर

पत्रकार वागळेंवरील हल्ल्याचा पारनेर तालुक्यातील पत्रकारांनी केला निषेध..

Spread the love

पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पुणे येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, ऍड.असीम सरोदे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर काही समाज कंठकांनी भ्याड हल्ला करत त्यांची गाडी फोडली.अशा समाजकंटकांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई व्हावी व त्यांना शिक्षा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने पारनेर तहसिल कचेरी व पारनेर पोलीस स्टेशनला सर्व पत्रकारांचे वतीने निवेदन देण्यात आले.पोलीस स्टेशनला,पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी तर,तहसिल कचेरीवर,नायब तहसिलदार गणेश आढारी,नायब तहसिलदार सुभाष कदम यांनी निवेदनाचा स्विकार केला.

लोकशाही व संविधान बचावासाठी, लढणार्‍या एका जेष्ठ पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला झालेला आहे.पत्रकार संरक्षण कायद्यानुसार या हल्लेखोरांवर कडक कारवाई अशी मागणी करत राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने सर्व पत्रकारांनी या घटनेचा जाहीर निषेध केला.याप्रसंगी जेष्ठ पत्रकार दत्ता गाडगे,सुरेशपाटील खोसे,मुकुंद निघोजकर,संतोष कोरडे,वसंत रांधवन,संपत वैरागर, प्रविण करपे, महेश शिंगोटे आदी पत्रकार उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!