पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी टाकळी ढोकेश्वर यांच्या वतीने टाकळी ढोकेश्वर येथे वासुंदे चौकातील नंदा हाइट्सच्या प्रांगणात हळदीकुंकू समारंभ व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लकी ड्रॉ पद्धतीने महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले. तसेच मंगळागौरीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये टाकळी ढोकेश्वर मधील एक हजारापेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या राणीताई लंके, सरपंच संध्याताई ठुबे, ऍड.स्नेहा झावरे, या प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळे सौ. लंके म्हणाल्या की महिला या हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात आणि विचारांची त्यामुळे देवाणघेवाण होते. आजच्या काळात महिला या पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाऊन काम करत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येत काम केले पाहिजे यापुढील काळात महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात आणखीन काम होणे गरजेचे आहे असे मत राणीताई लंके यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, कान्हूर पठार गावचा लोकनियुक्त सरपंच संध्याताई ठुबे, टाकळी ढोकेश्वरच्या सरपंच अरुणाताई खिलारी, माजी सरपंच सुनीताताई झावरे, पल्लवीताई तराळ, ग्रामपंचायत सदस्या सुग्राबी हवालदार, प्रियंकाताई बांडे, छायाताई गोरडे, रेश्मा हवालदार, सुनंदाताई गोरडे, मनीषा पाटील, सविता चव्हाण, संगीता निवडुंगे, शोभा रांधवन, सारिका रोकडे, संगीता रांधवन, सुरेखा बांडे, मनीषा झावरे, आशा बांडे, सुरेखा पायमोडे, जयश्रीताई बोरुडे, सुजाता रांधवन, शितल रांधवन, जयश्री तराळ, आदी परिसरातील महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, रावसाहेब झावरे, अशोक जाधव, महेश पाटील, गंगाधर बांडे, विलास धुमाळ,शुभम निवडुंगे, शिरीष गोरडे, बबनराव बांडे, शुभम गोरडे, सोमनाथ बांडे, बबलू झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, जयसिंग झावरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, भाऊसाहेब झावरे, मळीभाऊ रांधवन अशपाक हवालदार, विक्रम झावरे, आदी मान्यवर व निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यावेळी टाकळी ढोकेश्वर येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
HomeUncategorizedबचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होतात : राणीताई लंके, टाकळी ढोकेश्वर येथे हळदी- कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होतात : राणीताई लंके, टाकळी ढोकेश्वर येथे हळदी- कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0Share
Leave a reply