Disha Shakti

सामाजिक

कै.लालाशेठ बिहाणी बाल विद्या मंदिर शाळेत संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे :  राहुरी शहरातील नामांकित शाळा कै.लालाशेठ बिहाणी बाल विद्या मंदिर शाळेमध्ये आज दिनांक 15-2-2024 रोजी संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या जयंती निमित्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अँक्टीव्ह न्युज मराठीचे पत्रकार प्रशांत जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या जयंती निमित्त संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्व शिक्षकवृंदांनी बोलताना सांगितले की संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी तर त्यांचे निधन 4 डिसेंबर 1806 मध्ये झाला.ते बंजारा समाजाचे धर्मगुरू म्हणून ओळखले जायचे.नाईक कुळातील या भीमा नाईक यांचे ते चिरंजीव होते.वडील एवढे श्रीमंत होते की सात पिढी बसून आरामात जेवण करतील मात्र रूढी व परंपरा यांच्याने मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आस सदगुरू श्री.सेवालाल महाराज यांच्या मनात आली.

यावेळी मुख्याध्यापक श्री.गुलाब मोरे सर‌,बाळासाहेब राठोड सर, संदिप रासकर सर, नानासाहेब पवार सर, दत्तात्रय हेंद्रे सर,रूपाली पवार मॅडम, सविता साखरे मॅडम, जयश्री पाटोळे मॅडम,नंदा काळे मॅडम,अलका आढाव मॅडम, श्रीमती बारसे मॅडम, श्रीमती शेटे मॅडम तर सुत्रसंचलान सविता जगताप मॅडम यांनी केले तर यावेळी मोठा प्रमाणावर पालक वर्ग उपस्थित होता.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!