बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : के आर सी टेक्नोस्पर्ट राज्य पाणी व स्वच्छता विभाग व जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत बिलोली येथे जल जीवन मिशन टप्पा दोन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे संचालन व देखभाल दुरुस्तीचे दोन दिवसीय अनिवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण ०७ व ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आले. कार्यशाळेत पाणीपुरवठा समिती सरपंच, उपसरपंच, स्वच्छता व पाणीपुरवठा समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ता व जलसुरक्षक उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे नियोजन गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा संपन्न झाली.
प्रशिक्षणादरम्यान पंचायत समिती चे गट विकास अधिकारी पद्मवार साहेब, अतीरीक्त गट विकास अधिकारी क्षीरसागर साहेब, विस्तार अधिकारी जाधव सर व नायब तहसीलदार डी डी कुलकर्णी साहेब, बा. वि. शाखा अभियंता चीटलकर साहेब माजी शिक्षण सभापती अर्धापूर राजेश मानुरीकर सर, तालुका सरपंच संघटना अधक्ष चेतना ताई, बँक सखी, व तसेच बिआरसी यांनी भेट देऊन पाहणी केली. झूम मीटिंग द्वारे जिल्हा परिषद चे स्वच्छता कक्षातील एचआरडी सुशील मानवतकर यांनी पाहणी केली.
प्रशिक्षणा दरम्यान टेक्नोस्पर्ट रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेमार्फत पाणीपुरवठा योजनेचे संचालन व देखभाल दुरुस्ती, पाणी पट्टी वसुली, ई. विषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याकरिता संस्थेने निरनिराळ्या खेळाद्वारे व समंधित विषयाच्या जागृती संदर्भातील चित्रफिताद्वारे आणि साईड स्टॅन्ड वरील जागृती संदेशांद्वारे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करून नंतर सत्रांद्वारे मार्गदर्शन केले.
बिलोली येथे जल जिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्य देखभाल दुरुस्ती विषयावर कार्यशाळा संपन्न

0Share
Leave a reply