मुंबई कांदिवली प्रतिनिधी / भारत कवितके : कांदिवली पश्चिम येथील वांझा वाडी, मथुरादास रोड, चव्हाण हायस्कूल जवळ ज्ञानोबा तुकाराम वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ (वासकर फड ) कांदिवली यांचे मार्फत जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचे आयोजन सोमवार दिनांक 25 मार्च 2024 ते बुधवार दिनांक 27 मार्च 2024 या कालावधीत करण्यात येणार असल्याचे भजन मंडळात च्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. गुरुवर्य वै.ह.भ.प.आप्पासाहेब वासकर महाराज प्रणित गुरुवर्य वै.ह.भ.प.विवेकानंद आप्पासाहेब वासकर (दादा) महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने श्री.गुरुवर्य हे.भ.प.कौस्तुभ विवेकानंद वासकर (राऊ मालक ), श्री.गुरुवर्य हे.भ.प.देवव्रत विवेकानंद वासकर ( राणू मालक), वासकर फड यांच्या नेतृत्वाखाली जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज,संत निळोबाराय, संत नामदेव महाराज यांनी निवेदन करुन ठेवलेल्या परंपरेनुसार बीजोत्सवानिमित्त मंचरी पारायण, प्रवचन, कीर्तन,हरीजागर असे भक्ती मय कार्यक्रम होणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमा मध्ये सोमवार दिनांक 25 मार्च 2024 ते बुधवार दिनांक 27 मार्च 2024 पर्यंत दररोज पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत काकड आरती, सकाळी 7 ते 12 आणि 2 ते 4 मंचरी पारायण व 4 ते 5 हरीपाठ, होईल. तसेच सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 7 गुरुवर्य ह.भ.प.वासकर महाराजाचे प्रवचन, ह.भ.प.सचीन गोटखिंडे (सांगली) यांचे रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत कीर्तन, रात्री 10 नंतर ज्ञानोबा तुकाराम वारकरी सांप्रदायिक भजन मंडळाचे हरीजागर तर मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 7 गुरुवर्य ह.भ.प.वासकर महाराज यांचे प्रवचन, ह.भ.प.रविंद्र नामदेव तावडे ( मुंबई) यांचे कीर्तन व रात्री 10 नंतर विठ्ठल रखुमाई भजन मंडळाचे हरीजागर आणि बुधवार दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 बीजोत्सव निमित्त ह.भ.प.यशवंतबुवा मधुकर पाटील (ठाणे)यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.कीर्तनास साथ गायक ह.भ.प.श्री.संदीप सकपाळ, मृदंग मणी ह.भ.प.श्री.दिलीप कुचेकर, ह.भ.प. श्री.रविंद्र तावडे,ह.भ.प. श्री.नंदकुमार वरळीकर, ह.भ.प. श्री.निवृती तावडे हे साथ देणार आहेत.सर्व कार्यक्रमा दरम्यान चहा, नाष्टा, आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी बीजोत्सव निमित्त दुपारी 11 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.या बीजोत्सव कार्यक्रमात सहभागी व्हावे असे ज्ञानोबा तुकाराम वारकरी सांप्रदायिक भजन मंडळाने कळविले आहे.
Leave a reply