राहुरी प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 25 फेब्रवारी 2024 च्या मध्यरात्री मोबाईल दुकान फोडून एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम व दुकानात बसवलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर तसेच इंटरनेट वापरण्यासाठी असलेले मोडेम, 3 मोबाईल,1 स्मार्ट वॉच, सॅमसंग कंपनीचा टॅब श्री गणेश मोबाईल शॉपी, गोकुळ कॉलनी राहुरी फोडून चोरीला गेल्याची फिर्याद फिर्यादी नामे ऐश्वर्या अभिजीत खाडे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध दिलेली होती. त्यानुसार गुरं न भादवि कलम 457 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार वैराळ करत असताना त्यांना माहिती मिळाली की आरोपी नामे दिलीप रुमालसिंग जाधव, जिल्हा बडवानी मध्य प्रदेश, व अनिल छत्तर सिंग डावर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश यांनी सदरची घरफोडी चोरी केलेली आहे. त्यानुसार पो हवा वैराळ, शेळके यांनी सदर आरोपी यांना दिंडोरी, नाशिक इथून ताब्यात घेऊन अटक करून अटक मुदतीत त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी डीव्हीआर, इंटरनेट मोडेम , टॅब, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच तसेच गुन्हा करताना वापरलेली कटावणी जप्त केलेली आहे. सदर गुन्हा त्यांचे इतरही साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तपास पोलीस पो हवालदार विकास वैराळ करत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, एएसआय गीते, पोलीस हवालदार विकास वैराळ, पोलीस हवालदार शेळके, पो शि जयदीप बडे, नदीम शेख,गोवर्धन कदम, फैजल शेख, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.
Leave a reply