विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असणार्या माता बनाईदेवीच्या यात्रोउत्सवाच्या निमित्ताने ढोल ताशाच्या गजरात आणि माईल बॅंन्जोच्या तालावर फकीर शहावली बाबांचा संदल, बनाईदेवी, मळगंगादेवी , मुक्ताई देवीच्या मानाच्या काठी तरुण मित्र मंडळाने नाच वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत यात्रोत्सव साजरा करण्यात आला.
पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथे बनाईदेवी यात्रा उत्सव कमिटीचे मार्गदर्शक बाळासाहेब खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, राजूशेठ भंडारी, रावसाहेब झावरे सर, बबलू झावरे अध्यक्ष विक्रम झावरे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, खजिनदार मळिभाऊ रांधवण, संपतराव तराळ सचिव पत्रकार वसंत रांधवण, पप्पू पायमोडे, विलास धुमाळ, बंडूशेठ रांधवण, बबनराव बांडे, बबनराव पायमोडे यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रा उत्सवाच्या पहिल्या दिवशी गावातून ढोल ताशाच्या गतरात आणि माईल बॅंन्जोच्या समुद्र आवाजात वाजत गाजत व बनाईदेवी , मळगंगादेवी, मुक्ताई देवीचा जय जयकार करत काठीची व छबिना भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी करमणुकीसाठी मंगला बनसोडेसह नितीनकुमार बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी गावात कुस्त्यांचा जंगी हगामा ठेवण्यात आला होता. रात्री १० वा खास महिलांसाठी शबनम पुणेकर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात्रा उत्सवाच्या संगतेच्या शेवटच्या दिवशी सकाळी मुक्ताई देवीची काठी मिरवणूक रात्री ८.३० वा भव्य छबिना मिरवणूक रात्री १० वा नटखट सुंदरा ऑर्केस्ट्रा मराठमोळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावात कुस्त्यांचा जंगी हंगामा ठेवण्यात आला होता. या जंगी हगाम्यासाठी संगमनेर, अहमदनगर पुणे या तीन तालुक्यातील मोठ्या संख्येने मल्ल सहभागी झाले होते. यात्रोत्सवा दरम्यान तीन दिवस जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी रात्री भव्य छबिना मिरवणूक काढण्यात आली होती व मनोरंजनासाठी रात्री नटखट सुंदरा ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता झाली.
टाकळीढोकेश्वर येथील पोलिस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी या चार दिवसीय यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. टाकळीढोकेश्वर ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले.
Leave a reply