Disha Shakti

Uncategorized

घर फोडीतील सराईत आरोपीकडुन 8 तोळे, 1. 300 मिली वजनाचे रु. 2,68,300/- रु. किंमतीचे दागिणे जप्त, सोने विक्रीस मदत करणाऱ्या दोन साथिदारास तात्काळ अटक,

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 10/04/2024 रोजी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन उत्सव असल्याने यातील फिर्यादी प्रसाद विशाल गायकवाड, वय 25 वर्षे, धंदा – खा. नोकरी. रा. गुरुनानक नगर, फेज-2, वार्ड नं.02, श्रीरामपूर व त्यांची आई स्वाती गायकवाड असे आम्ही दोघे आमचे राहते घराला कुलुप लावुन सकाळी 09/30 वा. सुमारास राम मंदिर आणि सावता रोड येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे गेलो व त्यांनतर साधारण दुपारी 01/15 वा. चे सुमारास परत घरी आलो असता आम्हाला आमच्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडुन दरवाजा उघडा दिसला. त्यांनतर आम्ही घरात जावुन पाहिले असता आमचे घरातील बेडरुम मधील दोन्ही कपाट उघडे दिसले व त्यामधील कपडे व सामना अस्ताव्यस्त पडलेले दिसले व कपाटामध्ये ठेवलेले 40,000/- रु. रोख रक्कम व 3.5 तोळे सोन्याचे दागिणे मिळुन आले नाहीत. तेव्हा आमची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीच्या इरादयाने स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता रोख रक्कम व सोन्याचे दागिणे चोरुन नेले आहेत वगैरेच्या फिर्यादी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 440/2024 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे दिनांक 10/04/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा दाखल होताच मा. पोनि. नितीन देशमुख सो. यांनी तपास पथकास सदर गुन्हयातील गेले मालाचा व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषंण करुन सदरचा गुन्हा हा विधीसंर्षीत बालक रा. नवी दिल्ली, वार्ड नं. 02, श्रीरामपूर यांने केला असल्याचे निष्पण झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेत असताना दिनांक 14/04/2024 रोजी सदरचा आरोपी हा नवी दिल्ली पाटाच्या पुलावर वार्ड नं. 02, श्रीरामपूर येथे आला असल्याची गुप्त बातमीदारा मार्फती माहिती मिळाल्याने तपास पथक तात्काळ सदर ठिकाणी जावुन विधीसंर्षीत बालकास चौकशी कामी ताब्यात घेवनु त्याच्याकडे नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली  दिली.

सदर गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी रोख रक्कम मी खर्च केली व सोन्याचे दागिणे पैकी काही दागिणे हे साथिदार नामे 1) सर्फराज उर्फ सफ्या बाबा शेख, वय 20 वर्षे, रा. बिफ मार्केट जवळ, वार्ड नं. 02, श्रीरामपूर जि. अहमदनगर यांच्याकडे दिल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीस वार्ड नं. 02 बिफ मार्केट परिसरातुन ताब्यात घेवुन त्याच्याकडे सदर मुद्देमालाबाबत तपास केला असता त्याने सदरचा मुद्देमाल हा साथिदार नामे 2) सैफुद्दीन नजरुल इस्लाम उर्फ राजु बंगाली, धंदा- सोन कारागीर, रा. स्वप्ननगरी, वार्ड नं. 02, श्रीरामपूर याला विकला असल्याचे सांगितले. सदर सोने कारागीर याला त्याचे राहते घरुन ताब्यात घेवुन सदर मुद्देमाला बाबत तपास केला असता त्याने सदरचा मुद्देमाल हा मी गुन्हा घडलेल्या दिवशी दिनांक 10/04/2024 रोजी मुथ्थुठ फायनांन्स श्रीरामपूर येथे जमा करुन त्यांच्याकडुन गोल्ड लोन केल्याची माहिती दिल्याने सदर दोन्ही आरोपीताना तात्काळ नमुद गुन्हयात दिनांक 14/04/2024 रोजी अटक करण्यात आली. अटक कालावधीत फायनांन्स येथे जावुन तपास केला असता सदरचा मुद्देमाल आरोपीने दिनांक 13/04/2024 रोजी दोन दिवासात पुन्हा घेवुन गेला असल्याची माहिती प्राप्त झाली

तेव्हा सदरच्या मुद्देमालाबाबात सोने कारागीर सैफुद्दीन नजरुल इस्लाम राजु बंगाली याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदरचा मुद्देमाला हा मी प्रगती अलंकार, दुकांनाचे मालक प्रकाश पोपटराव बोकन, वय 55 वर्षे, धंदा- सुवर्णकार, रा.जिजामाता चौक, दत्त मंदिरासमोर, वॉर्ड नं. 04, श्रीरामपूर. यांच्या मदतीने संगनमत करुन मुथ्थुठ फायनांन्स, श्रीरामपूर येथुन सोडवुन घेतला आहे व त्याचे वितळुन, पाणी करुन त्यांची 32 ग्रॅम वजनाची लगड बनवुन अलंकारचे मालक प्रकाश पोपटराव बोकन यांना विकली आहे. अशी माहिती दिल्याने सदरचा मुद्देमाल 1,84,000/-रु. किंमतीची 32 ग्रॅम वजनाची लगड प्रकाश पोपटराव बोकन यांच्याकडुन जप्त करण्यात आली आहे

सदर गुन्हया व्यतिरिक्त श्रीरामपूर शहरात वेळोवेळी घडलेल्या दिवसा घरफोडीच्या गुन्हयाबाबत विधीसंर्षीत बालकाकडे तपास केला असता त्यांने खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडुन नमुद गुन्हयातील गेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीतांकडुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे तात्काळ उघड करण्यात आले असुन नमुद गुन्हयातील 8 तोळे 1.300 मिली वजानाचे 2,68,300/- रु किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि.पोलीस उपनिरीक्षक/ दिपक मेढे, पोहेकॉ/ सचिनकुमार बैसाणे, पोना/रघुवीर कारखेले, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/संभाजी खरात, पोकों/अि पटारे, पोकॉ/ गणेश तुपे,पोकॉ/राम तारडे, मपोकॉ/ मिरा सरग तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/संतोष दरेकर, पोना / सचिन धनाड, पोना/वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.
पोलीस


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!