तेर बातमीदार / विजय कानवडे :– प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव तालुक्यातील तेर येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतपरीक्षक श्री संत गोरोबा काकांच्या वार्षिक पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे प्रशासक सह धर्मादाय आयुक्त रू. र.कोरे/बारवडे, निरीक्षक अतुल नळणीकर व व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी दिली.
यात्रा काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासना कडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेसाठी ग्रामपंचायत कार्यालय तेर , मंदिर ट्रस्ट ,आरोग्य विभाग ,आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा कडून , महावितरण कार्यालय या सर्व विभागाकडून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
गोरोबा काकांचा 707 वा वार्षिक पुण्यतिथी समाधी सोहळा चैत्र वैद्य दशमी ते चैत्र वैद्य चतुर्दशी म्हणजेच दिनांक 3 मे ते 7 मे या कालावधीत संपन्न होणार आहे. यात्रेवर सीसीटीव्हीची करडी नजर ठेवण्यात आली आहे.या उत्सवा दरम्यान भजन, कीर्तन ,प्रवचन, पालखी मिरवणूक व गोपाळकाला अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या तेर मध्ये दाखल होत आहेत.एकादशीची महापूजा सह. धर्मादाय आयुक्त रू. र. कोरे/बारवडे यांच्या हस्ते होणार आहे.
गोरोबा काकांच्या यात्रेस सुरुवात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या तेर नगरीत दाखल

0Share
Leave a reply