विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, तक्रादार सौ. कांता सुभाष पुरी रा.फ्लॅट नंबर १०१, दर्शन पॅलेस, नवले नगर, गुलमोहोर रोड, नवलेनगर, सावेडी अहमदनगर या दिनांक ०२/०५/२०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वा. चे सुमारास नवले नगर चौकातुन हनुमान मंदीराकडे पायी जात असतांना मोटारसायकलवरील दोन अनोळखी आरोपींनी फिर्यादीस धक्काबुक्की करुन व खाली पाडुन त्यांचे गळ्यातील २१,०००/- रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन बळजबरीने ओढुन चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. ५६९/२०२४ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. अहमदनगर शहरामध्ये चैन स्नॅचिंगच्या घटना घडत असल्याने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी श्री दिनेश आहेर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संतोष खैरे, फुरकान शेख, मयुर गायकवाड, सागर ससाणे, मच्छिद्र बर्डे, अमृत आढाव, संभाजी कोतकर यांचे पथक तयार करुन चैन स्नॅचिंग करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते. वरील पोलीस पथकाने अहमदनगर शहरामध्ये झालेल्या चैन स्नॅचिंग गुन्हे घडले ठिकाणी भेट देवुन सी.सी.टी.व्ही. फुटेज संकलित केले होते. सदर फुटेजमधील संशयीत आरोपींची माहिती काढत असतांना फुटेजमधील एक इसमाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
सदर आरोपीची माहिती काढत असतांना पथकास सदर आरोपी हा त्याचे साथीदारासह वाकोडी फाटा ते वाकोडी जाणारे रोडवर असलेल्या नाल्याजवळ थांबले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने सदर बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करता तेथे ०३ संशयीत इसम मिळुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) बिरजा उर्फ बिरजु राजु जाधव वय २३ वर्षे, रा. मकासरे चाळ, कायनेटीक चौक, अहमदनगर, २) कृष्णा उर्फ बुट्या मुकेश रनशुर वय १९ वर्षे, रा.समाज मंदीराजवळ, वाकोडी, ता. जि. अहमदनगर, ३) कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे वय २५ वर्षे, रा. समाजमंदीराजवळ, वाकोडी, ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे सदर गुन्हयाबाबत सखोल व बारकाईने तपास करता त्यांनी वर नमुद गुन्हा व आणखी एक गुन्हे केल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्यातील सोन्याचे दागिण्याबाबत विचारपुस करता आरोपी नामे बिरजा उर्फ बिरजु राजु जाधव याने चोरी केलेले दागिने हे त्याचे नातेवाईकाकडे ठेवले असल्याचे सांगितल्याने आरोपीचे नातेवाईकाकडुन १,८९,०००/- रुपये किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ताब्यातील आरोपींकडुन खालीलप्रमाणे एकुण ०२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम १.तोफखाना
५६९/२०२४ भादवि कलम ३९४, ३४, २.तोफखाना ३७७/२०२४ भादवि कलम ३९२, ३४ आरोपी नामे बिरजा राजु जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा, तयारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, दुखापत करणे असे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत.गु.र.नं. व कलम अ.क्र.पोलीस स्टेशन कोतवाली,९.भिंगार कॅम्प, १०.कोतवाली, ११. कोतवाली १२८/२०१४ भादवि कलम ३२४, ३२३, १४१, १४३ ५६/२०१६ भादवि कलम ३०७, ३५३, ३३३ ५८/२०१६ भादवि कलम १४३, १४७, ४३६ २८९/२०१६ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४ ५३२/२०१७ भादवि कलम ३९९, ४०२ ५७८/२०१९ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४ १५९०/२०१९ भादवि कलम ३९२, ३४ १६५०/२०१९ आर्म अॅक्ट ४/२५ ६४७/२०१९ भादवि कलम १४३, १४७, ३२४, ३२३ ६०५२/२०२० भादवि कलम ३९२, ३४ ४४७/२०२४ आर्म अॅक्ट ३/२५ आरोपी नामे कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे याचेविरुध्द यापुर्वी खुनाचा खालीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे. अ.क्र. पोलीस स्टेशन १.भिंगार कॅम्प गु.र.नं. व कलम १६७/२०१९ भादवि कलम ३०२, ३०७ ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
अहमदनगर शहरामध्ये चैन स्नॅचिंग करणारे ०३ आरोपी, १,८९,०००/- रुपये किमतीचे दागिण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

0Share
Leave a reply