राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे 26 मे रोजी सायंकाळी एका महिलेला एका ओमिनी कारने जोराची धडक दिल्याने त्या महिलेचा मृत्यु झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गोटुंबे आखाडा येथे सदरील अपघातात मृत झालेल्या महिलेच्या मृतदेहासह ग्रामस्थांनी सोमवार दिनांक 27 मे रोजी भर उन्हात गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्याने प्रशासनाची धावपळ उडाल्याने नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन दिले असता त्यांनी दोन दिवसांत गतिरोधक बसवून देण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर ग्रामस्थांनी त्या महीलेचा अंत्यविधी करण्यात आला होता. ग्रामस्थांच्या तिव्र आक्रोश व संतप्त प्रतिक्रीया नंतर प्रशासन खडबडून जागे होऊन आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी 28 मे रोजी गोटुंबे आखाडा येथे नागरिकांच्या उपस्थितित गतिरोधक बसविण्यात आले.
यावेळी डॉ.आण्णासाहेब बाचकर, माजी उपसरपंच उमेश बाचकर, पत्रकार रमेश खेमनर, शिवाजी दवणे, जालिंदर गडधे, नंदू हरिश्चंद्रे, बिरु ठोंबरे, बापू पिसाळ, शरद बाचकर, भारत पवार, ताया शिंदे, बाळू दाभाडे यांच्यासह नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत गावातील महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसवून घेतले. गतिरोधक बसविल्यानंतर ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहॆ यामुळे वाहनाच्या स्पीड वर आता नियंत्रण बसणार आहॆ परंतु या गतिरोधक वर पांढरे पट्टे बसविणे गरजेचे असून अन्यथा गतिरोधकावर अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागील वाहन पुढील वाहनावर आदळून अपघात होण्याची शक्यता असून प्रशासनाने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराकडून पांढरे पट्टे मारून घेणे गरजेचे असल्याच्या चर्चा नागरिकांमधुन होत आहॆ.
गोटुंबे आखाडा येथील ग्रामस्थांच्या मागणीला यश ; रास्तारोको केल्यानंतर दोन दिवसांत बसविले गतिरोधक

0Share
Leave a reply