Disha Shakti

इतर

पळशीच्या २१ वर्षीय गंभीर जखमी तरुणाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू, तरुणाचा अपघात नव्हे तर घातपाताचा संशय

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : तालुक्यातील पळशीच्या २१ वर्षीय तरुण अजिंक्य अरुण डहाळे याच्या दुचाकीची वडगाव सावताळच्या रस्त्यावर पिक – अपला धडक बसल्याने अपघात झाला असल्याची घटना ११ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता घडली होती. या तरुणाला उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर खाजगी रुग्णालयात शनिवारी रात्री २२ जुन रोजी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. परंतु हा अपघात नसून त्याचा घात करून खून झाला असल्याची तक्रार डहाळे यांच्या कुटुंबीयांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे शनिवारी रात्री लेखी निवेदन द्वारे केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील पळशी येथील संशयित संदिप सुखदेव मोढवे व सुखदेव मोढवे या दोन्ही आरोपींवर खुनाचा दाखल करून तातडीने अटक करावी अशी मागणी या तरुणाच्या आईसह नातेवाईकांनी लेखी निवेदनाद्वारे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे‌ लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

तर दुसरीकडे नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन न करता या मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद घाटी येथील शासकीय रुग्णालयात करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे पळशी गावामध्ये दोन दिवसापासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेत हा तरुणाच्या पायाला हाताला डोक्याला गंभीर मार लागल्याने नगरच्या खाजगी रुग्णालयात डोक्याला शस्त्रक्रिया करून उपचार चालू होते. परंतु या जखमी तरुणाच्या कुटुंबियांनी हा अपघात नव्हे तर हा पुर्व नियोजित कट व हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे.

यासबंधीची फिर्याद नुतन अरुण डहाळे वय ३७ वर्षे, धंदा-घरकाम, राहणार -पळशी, ता – पारनेर यांनी दिली असून या प्रकरणी संदिप सुखदेव मोढवे त्याचे वडील सुखदेव मोढवे पुर्ण नाव माहीत नाही दोघे रा. पळशी, ता. पारनेर, जि.अ.नगर यांच्यावर ३०७ कलमान्वये गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. वडगाव सावताळ गावात सावताळ बाबा कमानीच्या जवळ ११ जुन रोजी रात्री ७ .४५ वाजता ही घटना घडली असून १३ जुन रोजी अपघाताचा बनाव रचून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी फिर्यादीवरून दोघा बाप – लेकांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर व पारनेर पोलिस करत आहेत.

पारनेर पोलीसांच्या तपासात तर हा अपघातच : पोलिस निरीक्षक समीर बारवकर

या घटनेतील अजिंक्य अरुण डहाळे यांच्या दुचाकीने ११ जुन रोजी सायंकाळी वडगाव सावताळ रस्त्यावर सावताळ बाबा कमानीजवळ एका पिक अपला धडक दिल्याने त्याच्या डोक्याला उजव्या हाताला व पायाला मार लागला आहे. जखमी डहाळे यांच्या आईची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात ही पिकअप ताब्यात घेण्यात आली असून फिर्यादीच्या कुटुंबाचा संशय पळशी येथील ज्या दोन व्यक्तींवर आहे त्यांना पारनेर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात पण आले होते. या घटनेतील संशयित आरोपींचे मोबाईल लोकेशन घटना दिवशी पळशी या ठिकाणी आढळून आले आहे. त्यामुळे हा अपघातच असून या घटनेतील दोन्ही संशयित पारनेर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीच्या भीतीने शनिवारी रात्री स्वतःहून हजर झाले असून अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बसून ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!