बिलोली प्रतिनिधी /साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील लोहगांव येथून श्रीमहादेव मंदिर व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथून ज्ञानोबा तुकोबा नामघोषात श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे गावातील राजेंद्र रेड्डी तोटावाड, नागोराव नाईनवाड, दत्ता पाटील पांढरे, विठ्ठल देशमुख, लक्ष्मण महाराज, पिराजी अनंतवाड, बालाजी देशमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून भगवा झेंडा दाखवून दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. दिंडी संपर्कप्रमुख राजेंद्र रेड्डी तोटावाड यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. ग्रामस्थांच्या वतीने दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दिंडीमध्ये गावातील वारकरी महिला व पुरुष अबाल वृद्ध त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
राजेंद्र रेड्डी तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोहगांव ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

0Share
Leave a reply