अ. नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथिल रहिवासी श्रीमत् आद्य जगद्गुरु शंकराचार्य भक्तीयोग सेवा ,आणे आश्रमाचे प्रेमानंद महाराज शास्त्री आण्णा यांना जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव- २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार शनिवार दि.२२ जून २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता नगर शहरातील लक्ष्मीनारायण सभागृह अहमदनगर येथे सरसेनापती यशवंत सेना मुंबई माधव गडदे, यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष विजय तमनर, देविदास कोकाटे, पत्रकार रमेश खेमनर, पत्रकार वसंत रांधवण जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, प्रकाश भामरे, राजेंद्र तागड, श्रीरंग गडदे, सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला नलावडे, उज्वला राजगुरू,यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेमानंद महाराज शास्त्री यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. विशेष म्हणजे अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात व स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटाऊन आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. प्रेमानंद महाराज शास्त्री यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल टाकळीढोकेश्वर,आणे पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी विषयी प्रेमानंद महाराज यांचे अभिनंदन केले आहे.
जीवन गौरव पुरस्काराने प्रेमानंद महाराज शास्त्री सन्मानित, प्रेमानंद महाराज शास्त्री जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी

0Share
Leave a reply