Disha Shakti

क्राईम

राहुरी तहसिल मधील कर्मचारी 1500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : जमिनीच्या उतार्‍यावरील कब्जेदार सदरी असलेले महाराष्ट्र सरकार नाव कमी करण्यासाठी 1500 रुपयांची लाच स्विकारताना राहुरी तहसिल कार्यालयातील एका कर्मचार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने महसूल वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पथकाने या कर्मचार्‍याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत माहिती अशी, राहुरी तालुक्यातील रामपुर येथील तक्रारदार (वय 50) यांची ग.न.372/2 मध्ये 60 गुंठे क्षेत्र असून त्यापैकी 30 गुंठे क्षेत्रावर कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकार नाव आहे. सदरचे नाव कमी करण्यासाठी रामपूरच्या तलाठ्यांना पत्र देण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयातील शासकिय वसूली विभागाचा महसूल सहाय्यक सुनील भागवत भवर (वय 46 रा. शेडगे मळा, श्रीरामपूर) याने तक्रारदार यांना 2000 रुपयांची लाच मागीतली. त्यानंतर तक्रारदार व आरोपी भवर यांच्यात 1500 रुपये देण्याची तडजोड झाली. तक्ररदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकड तक्रार केली. त्यानुसार काल दि. 1 जुलै 2024 रोजी नगर येथील सापळा आधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पो.नि. छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षण आधिकारी प्रवीण लोखंडे, पो.ना.चंद्रकांत काळे, पोेे.शि.सचिन सुद्रुक, चालक दशरथ लाड यांच्या पथकाने आरोपीस पंचा समक्ष 1500 रुपये लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होतेे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!