राहुरी शहर प्रतिनिधी( नाना जोशी) : आज दिनांक 18-8-2022 रोजी राहुरी शहरातील शुक्लेश्वर मित्र मंडळ व ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त मंडळाच्यावतीने राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीसांना व कैंद्याना राखी बांधण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी सी 24 तासचे संपादक व पोलीस टाईम्सचे जेष्ठ पत्रकार श्री वसंतराव झावरे सर,पत्रकार दिपक साळवे, पत्रकार धनंजय पुरोहित, पत्रकार नाना जोशी तसेच ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाच्यावतीने अक्का झावरे,अनिता पुरोहित,सुनीता बंड,धनश्री पुरोहित,नेत्रा पुरोहित,स्मिता जोशी प्रविण पुरोहित,सचिन घाडगे,संजय जाधव,वेद रिसबुड,आदिक खैरे,व्यापारी आसोसियश्नचे अध्यक्ष संतोष शेठ लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिंनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.