Disha Shakti

इतर

नांदूर सहजपूर येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळवण्यासाठी उमेश म्हेत्रे यांचे अमरण उपोषण…

Spread the love

प्रतिनिधी / किरण थोरात : दि . ०१/०७/२०२४ रोजी ११.वाजता नांदूर फ्लिटगार्ड कंपनी समोर सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे, योगेश बोराटे, सोमनाथ बोराटे, राजेश पारवे हे उपोषणाला बसले असून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, नांदुर सहजपुर कंपन्यातील केमिकल्स मिश्रीत पाण्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी, पिण्याचे स्रोत खराब होत असून त्यातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे,नांदूर – सहजपूर कंपन्यातील बॉयलरची उंची शासकीय नियमानुसार नसल्याने त्या बॉयलरच्या राखेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुटंणे, पिके जळणे या अन्यायातून शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळणे, कंपन्यानी कंपनीतील छोटी मोठी कामे स्थानिकांना देणे,
येथील कंपन्यात शिक्षण होऊनही मुलांना ६ महिने कामावर घेतले जाते.

तरीही शिक्षण असलेल्या मुलांना पर्मनंट व पंचक्रोशीतील मुलांना कायमस्वरूपती कामावर घ्यावेत.
नांदूर सहजपूर इंडस्ट्रियल कंपन्यातील केमिकल्यमिश्रीत सांडपाण्यामुळे परिसरातील सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत खराब होत असून त्यामुळे लहानमुले आजारी पडल्याचे प्रमाण वाढले आहेत. तरीही कंपन्यानी हे पाणी प्रक्रिया करून विल्हेवाट लावावी जेणेकरुन पिण्याचे पाणी खराब होणार नाहीत तसेच नापिक झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत कंपन्यांनी करावी आणि कंपन्यातील बॉयलरची उंची कमी असल्याने त्यातून निघणारा धुर व राख शेतकऱ्यांच्या पिकांवर पडत आहेत. त्यामुळे पिकाची वाढ होत नाहीत पिके जळत आहेत तरीही शासनाने लक्ष देऊन चुकीच्या पध्दतीने वागणाऱ्या कंपन्याना बॉयलरची उंची नियमानुसार ठेवण्यात सांगावे व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.यासाठी आम्ही सर्वजण अमरण उपोषण करत अहो अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी दिली.तसेच नांदूर व सहजपूर गावातील नेते मंडळी सोडून सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व शेतकऱ्यांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!