जामनेर / विट्ठल ठोंबरे :आपल्या समाजात डॉक्टरांना मोठा दर्जा दिला जातो. तो जीवनाचा रक्षणकर्ता मानला जातो. अलीकडेच कोरोना महामारीच्या काळात जगभरातील डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता पीडितांवर उपचार केले. आजचा दिवस म्हणजेच १ जुलै देशभरात डॉक्टर्स डे (National Doctor’s Day ) म्हणून साजरा केला जातो.
डॉ.रवींद्र कासट व डॉ.सौ.किरण कासट जामनेर यांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त दक्ष स्वयंसेवक फौंडेशन तर्फे कुबेराचे वृक्षरोप देऊन शुभेच्छा देण्यात आल्या,तसेच डॉ. साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.बिधानचंद्र रॉय यांचा जन्म बिहार राज्य मधील पाटणा जिल्यातील बांकीपूर येथे 1 जुलै 1882 रोजी झाला. एवढेच नाही तर 1 जुलै 1962 रोजी डॉ. बिधान रॉय यांचे निधन झाले. या कारणास्तव त्यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. हा दिवस पूर्णपणे डॉक्टरांना समर्पित आहे, जे प्रत्येक परिस्थितीत आपले कर्तव्य बजावताना रुग्णांवर उपचार करतात. हा दिवस भारतात पहिल्यांदा १९९१ साली साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो.
Leave a reply