प्रतिनिधी / युनूस शेख : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या म्हैसगांव येथे पंचवार्षिक निवडूक लवकरच होत असून या साठी राहुरीचे तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी सुनील हंडे ताहाराबाद यांच्या अध्यक्ष खाली म्हैसगांव येथे ग्रामसभा घेण्यात आली.
म्हैसगांव येथील ग्राम सभेची माहिती जास्त मोठ्या प्रमाणात नसल्याने या ग्रामसभेला एक ही महिला उपस्थित राहिली नाही, ग्रामसभा संपल्यानंतर त्या ग्रामसभेची माहिती कुणीही जास्त मोठ्या प्रमाणात महिलांना सांगू नये म्हणून प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांनी ही लपवण्याचा प्रयत्न केला की काय असे बोलले जात आहे. म्हैसगांव ग्रामसेवक श्री. पारधे यांनी ग्रामसभे बाबत माहिती दिली.
या वेळी राखीव जागा 2, सर्व साधारण स्त्री राखीव जागा 2. म्हैसगांव ग्रामपंचायत मध्ये पुरुष व स्त्री धरून एकूण तीन वॉर्ड आहेत. या वॉर्ड मध्ये स्त्री प्रमानात वाढ झाली त्या मध्ये वार्ड तीन मध्ये एकूण 9 जागा ग्रामपंचायतीला लढण्यासाठी आल्या आहेत. आरक्षण नागरिकांना सामोरे जावे लागणार असून यात महिलांची संख्या गेल्या वर्षी पेक्षा वाढविण्यात आली आहे. पुरुष कमी व महिला जास्त होणार असल्यामुळे पुरुषात कुजबुज होत असून महिलांचे प्रमाण जास्त असल्यामुळे म्हैसगांव ग्रामपंचायत सभेत पुरुषांची नाराजी दिसत होती.
या वेळी सरपंच रुपालीताई दुधाट, उपसरपंच सुभाष मुसुळे, किशोर शिरसाठ, शशिकांत देशमुख, दगडू केदार, मोहन विधाटे, माजी सरपंच गहिनीनाथ हुलूळे, सावित्रा गुलदगड, भाऊ गुलदगड, संजय गागरे,किरण विधाटे आदी मान्यवर व मोजके कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a reply