धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : काल निम्न तेरणा संघर्ष समिती आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची बैठक विधान भवन, मुंबई येथे झाली . या बैठकीसाठी जलसंपदा विभागाचे उपसचिव जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभाग मंत्रालय मुंबई , लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर , कार्यकारी अभियंता धाराशिव पाठबंधारे विभाग क्र -२ इत्यादी अधिकारी वर्ग , राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर , निम्न तेरणा संघर्ष समिती सदस्य जगदीश पाटील , गणेश क्षिरसागर , अमर माने, दिपक सूर्यवंशी , बाळासाहेब सूर्यवंशी, पद्माकर लादे , अश्विन पाटील , नेताजी गायकवाड , अंकुंश सुरतबनशी , अरुण कोळगे ,गौतम क्षीरसागर, गुंडाप्पा गाजरे, निलेश दिपक मोटे, गोवर्धन इराप्पा पांथरे , शाऊराज युवराज मोटे इ. सदस्य उपस्थित होते .यावेळी संघर्ष समितीने त्यांच्या तक्रारी मांडल्या आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
पार्श्वभूमी :-
– माकणी धरणातून १९९३ ते २००४ पर्यंत पूर्णत्वास आलेली निम्न तेरणा उपसा सिंचन योजना गेली कित्येक वर्ष शासनाच्या उदासीनतेमुळे बंद पडून आहे . २४ गावांमधील जवळपास ७००० हेक्टर शेतीला फायदा देणाऱ्या या योजनेसाठी शेतकऱ्यांनी काळ्या कसदार जमिनी दिल्या . हजारो कोटी रुपयाचे भांडवल वाया जात असून या भागात कायम दुष्काळ , पाणीटंचाईला सामोरे जावे लागते .या भागातील लोकप्रतिनिधींना कधीही स्वतः हून ही योजना चालू करावी असे वाटले नाही . वारंवार निवेदने देवूनही दखल घेतली गेली नाही . शेवटी २४ गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत निम्न तेरणा संघर्ष समितीची स्थापना केली . गेली पाच वर्ष गावागावात जनजागृती ते मंत्रालयापर्यंत योजनेचा पाठपुरावा केलेला आहे . जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदारांना आणि खासदारांनाही निवेदने दिली आहेत. छत्रपती संभाजी नगर येथील गोदावरी पाठबंधारे महामंडळाला ही या समितीने भेटी दिल्या आहेत .
निम्न तेरणा संघर्ष समितीच्या मागण्या :-
1. सिंचन योजनेच्या दुरुस्ती प्रस्तावाला अंतिम मंजुरी जुलै 2024 मध्येच मिळायला हवी.
2. योजनेचे काम एकाच टप्प्यात पूर्ण करावे.
3. योजनेसाठी पुरवणी अर्थसंकल्पात एकरक्कमी तरतूद करावी.विजय वडेट्टीवर यांच्या बैठकीचे तपशील
• बैठकीचा आदेश : 2 जुलै 2024
• बैठक बोलाविलेली तारीख: 5 जुलै 2024
• वेळ: दुपारी 2:00
• स्थळ: विधान भवन, मुंबईउपस्थित :-
– विजय वडेट्टीवार: विरोधी पक्षनेते, विधानसभा, महाराष्ट्र
– सक्षणाताई सलगर , युवती प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी
– जलसंपदा अधिकारी वर्ग
– निम्न तेरणा संघर्ष समितीपरिणाम
– बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी समितीला त्यांच्या कार्यासाठी पूर्ण पाठिंबा आणि वचनबद्धतेचे आश्वासन दिले.
– विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी विरोधी पक्षनेत्याकडून वचनबद्धताबैठकीतीतील अवतरणे :-
– विजय वडेट्टीवार: “मी सरकारला विधानसभेत प्रश्न करेन आणि या समस्येकडे लक्ष देण्यास नक्की सांगेन .
– सक्षणा सलगर: “ या दुरुस्ती प्रस्तावाला आचारसंहिता अगोदरच मंजूर मिळावी ”
– जगदीश पाटील: “जुलै महिन्यात अंतिम मान्यता न मिळाल्यास धाराशिव येथे मोठे आंदोलन करू.”निम्न तेरणा संघर्ष समिती आपल्या पाण्याच्या हक्कासाठीच्या लढ्यावर ठाम असून जोपर्यंत योजनेचे पुनरुज्जीवन होत नाही आणि शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक असलेले पाणी मिळत नाही तोपर्यंत सरकारवर दबाव आणत राहील . वित्त आणि नियोजन विभागाने तत्काळ मंजुरी द्यावी यासाठी लवकरच समिती अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेणार .
अधिक माहितीसाठी, संपर्क:
• नाव: जगदीश पाटील
– निम्न तेरणा संघर्ष समिती , धाराशिव
• फोन: 9022995275
निम्न तेरणा उपसा सिंचन संघर्ष समिती पाण्यासाठी मंत्रालयात विरोधी पक्ष नेत्यांनी बैठक बोलाविताच अधिकाऱ्यांची धावपळ

0Share
Leave a reply