राहूरी तालुका प्रतिनिधी / साजीद बागवान : नायगाव मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी विविध जनहितार्थ मागणीसाठी मशाल घेऊनी करूया प्रहार या लढ्यामध्ये दिनांक 11 /04/2025 रोजी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आवचित्य साधून शेतकरी कष्टकरी कर्जमाफी शेतकरी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यासाठी आमदाराच्या घरासमोर मशाल घेऊन करूया प्रहार या अनोख्या आंदोलनामध्ये ठीक सायंकाळी 8 वाजता गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्यालय समोर आठ वाजता सर्वांनी एकत्र येऊन येथून नांदेड येथे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या घरी ठीक बारा वाजता गळ्यामध्ये निळी दस्ती हातामध्ये भगवा झेंडा आणि मशाल हाती घेऊन महायुतीच्या आमदारांना बोलक करून शेतकऱ्याची कर्जमाफी हमीभाव या सह मागणी करायची आहे.
या मशाल घेऊन करूया प्रहार मागणीसाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे व यावेत अशी विनंती तथा आव्हान गजानन शंकरराव पाटील चव्हाण प्रहार जनशक्ती पक्ष 89 नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व करीत आमच्या तालुका प्रतिनिधीशी बोलताना निवेदन केली आहे
आमदाराच्या घरासमोर मशाल घेऊन करूया प्रहार आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित व्हावेत – गजानन पाटील चव्हाण

0Share
Leave a reply