Disha Shakti

राजकीय

अजनी सेवा सोसायटी निवडणूकीत प्रस्थापितांवर मात करून बद्देवाड यांचा शिवमल्हार पॅनल विजयी

Spread the love

कासराळी प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार :  बिलोली तालुक्यातील अजनी येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत माजी चेअरमन गोविंद बद्देवाड यांच्या शिव मल्हार शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 12 सदस्य प्रस्थापित उमेदवारांचा पराभव करून अंजनी सोसायटी निवडणुकीत बहुमताने विजयी झाले आहेत. त्यामुळे येथे हा धक्का मानला जात आहे. अजनी येथील सेवा सोसायटी निवडणूक सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश पाटील हांडे व माजी चेअरमन गोविंद बद्देवाड यांचे शिव मल्हार शेतकरी विकास पॅनल अशी परस्पर विरोधी पॅनल एकमेका विरोधात लढवली. एकूण 13 जागेसाठी हांडे यांनी तुल्यबळ उमेदवार दिले मात्र त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. तर माजी चेअरमन गोविंद बद्देवाड यांचे 13 पैकी 12 संचालक या सोसायटी निवडणुकीत विजयी झाले. ज्यात घरातील सहा सदस्यांचा समावेश आहे.

बद्देवाड यांच्या पॅनल मधील विजयी झालेल्या सदस्यात बद्देवाड दिगंबर मारोती, बदेवाड माधव धोंडीबा,बद्देवाड लक्ष्मण गंगाराम, बद्देवाड विमलबाई मारोती, बद्देवाड हनमंत धोंडीबा, बावलगावे अंबादास बिरगोंडा, बिराजदार माधवराव जयवंता, पाटील राधाबाई विठ्ठलराव,पुंजरवाड गोदावरी बाबुराव, बद्देवाड मारोती धोंडीबा,गावंडे पिराजी मरीबा , हांडे चंद्रशेखर मोतीराम, तर हांडे यांच्या गटाचे हावगीर तेजेराव पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान बद्देवाड यांच्या च्या पॅनलच्या विजयी उमेदवारांनी अजनी येथे गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

गोल्ला – गोलेवार समाज संघटनेचे बिलोली तालुकाध्यक्ष बाबुराव चरकुलवार यांनी माजी चेअरमन गोविंद बद्देवाड यांच्यासह विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान आमची उमेदवार पळवण्याचा प्रयत्न झाला धनशक्ती विरोधात आमच्या उमेदवारांना विजयी करून अजनीच्या मतदारांनी लोकशाहीचा आवाज बुलंद केल्या ची प्रतिक्रिया माजी चेअरमन आणि यां विजयाचे शिल्पकार गोविंद बद्देवाड यांनी विजया पश्चात दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!