इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : ISO प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व धनगर समाज संघर्ष समिती यांच्यावतीने वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प करून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा केला. मानव आणि निसर्ग यांच्यात दृढ संबंध आहेत. मानव या निसर्गातूनच जन्माला आला, वाढला आणि इथेच विलीन सुद्धा झाला. या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी या मिळू लागल्या. म्हणून त्याचे जीवन जगणे अत्यंत सोपे झाले. तसेच झाडे ही पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत. झाडांचे मानवाच्या जीवनात खूप महत्त्व आहे.
जंगले आणि वने ही निसर्गाच्या उत्तम सौंदर्याचा साठा आहेत. या जंगलांमधून पोसणारे निसर्गाचे स्वरूप हे मानवाला प्रेरित करते. जर या धरतीवर वन किंवा जंगल नसतील तर मानवाला आपले जीवन जगणे कठीण झाले असते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ अशा ओळींच्या माध्यमातुन संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व समाजाला समजावुन सांगितले आहे.धनगर समाज संघर्ष समिती ही समाजाचे नेते व अमरावती जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष भाऊ महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असते व ISO प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था ही संतांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सतत समाजाच्या सेवेत कार्य करीत असते.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचा निर्धार ISO प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व धनगर समाज संघर्ष समिती यांच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक दिलीप सोट पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मदनवाडीचे मुख्याध्यापक,श्री बनकर सर व सहशिक्षिक वाघ सर , कुदळे सर , गावडे सर ,संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील , सचिव धिरज सोट पाटील , संस्थेचे कार्याध्यक्ष सोनाली चोपडे,समन्वयक शामल सोट पाटील इत्यादी उपस्थित होते.
स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0Share
Leave a reply