Disha Shakti

सामाजिक

सन 2024 चा गणेशोत्सव पारंपारिक वाद्यांच्या गजरात पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याचा व्यापारी असोसिएशन राहुरी यांचा निर्धार

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे :  दिनांक.27/07/2024 रोजी 17/00 वा. ते 18/00 वा. चे दरम्यान राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील राहुरी शहरातील व्यापारी असोशियन यांची राहुरी पोलीस स्टेशन येथे मीटिंग घेण्यात आली आगामी गणेशोत्सव अनुषंगाने सौंदर्यपूर्ण वातावरणात पारंपारिक पद्धतीने डीजे मुक्त गणेश उत्सव कसा साजरा करण्यात येईल याबाबत चर्चा करण्यात आली सर्वांनी होकार दर्शवला असून तसेच सीसीटीव्ही कॅमेरे याबाबतही चर्चा करण्यात आली. शासनाचे मार्गदर्शनाप्रमाणे सर्वांना सूचना देण्यात आले आहेत तसेच त्यांच्या अडीअडचणी बाबत विचारपुस करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना देण्यात आल्या आहेत.

व्यापारी असोसिएशनचे प्रकाश बन्सीलाल पारख अध्यक्ष, संतोषकुमार शांतीलाल लोढा ,नंदकिशोर बट्टड , संतोष आळंदे, कांता तनपुरे, विलास बापूसाहेब तरवडे, संजय बन्सीलाल पारख, सूर्यकांत भुजाडी, अनिल शेठ कासार ,देवेंद्र लांबे, संजय सुधाकर उदावंत ,प्रवीण जुगल किशोर दरक, महेश दत्तात्रय कासार, नवनीत दरक, अन्सार भाई कादरी, महेश दिलीप शहाणे, रविंद्र उदावंत प्रवीण ,अरुण ठोकळे असे सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक असे 35 ते 40 जनसमुदाय उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!