नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भीतीपत्रिका भितीपत्रक काढून अभिवादन करण्यात आले हे भीतीपत्रक विद्यार्थ्यांनी स्वतः भित्तीपत्रक तयार करण्यात आले होते.
या भित्तीपत्रकामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनाविषयी सर्व माहिती मांडण्यात आली होती .या भित्तीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .के . हरिबाबू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. बालाजी गायकवाड व सहकारी प्रा.हांडे सर , प्रा डॉ प्रकाश हिवराळे, प्रा.वृदांवन नामवाडे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती
Leave a reply