राहता प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : ७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात एकूण १ लाख ९ हजार २२० विद्यार्थी बसले होते त्यापैकी फक्त ७ हजार २७३ विद्यार्थी उत्तीर्ण आले म्हणजे एकूण ६. ६६% निकाल लागला. त्यामध्ये राहता तालुक्यातील खडकेवाके गावामधील मुजमुले वस्ती शाळेचे आदर्श शिक्षक स्वप्निल शरद फापाळे यांनी सेट परीक्षेमध्ये यश मिळवल्याने त्यांचा खडकेवाके येथील ग्रामस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला.या परीक्षेमध्ये श्री.स्वप्निल फापाळे सर यांनी बाजी मारली. फापाळे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजमुले वस्ती येथे विद्यार्थी समवेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मुजमुले, दै. सार्वमत चे पत्रकार चंद्रकांत लावरे, सामाजिक कार्यकर्ते संदीप लावरे, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, संदीप मुजमुले ,बापू मुजमुले , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुभाष लावरे. सुदाम वाघे, आदी उपस्थित होते.
Leave a reply