Disha Shakti

शिक्षण विषयी

गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेस मिळाले ३ लाख रुपये किमतीचे २० टॅब, शिक्षिका मोरे मॅडम यांच्या पाठपुराव्यास यश

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील सडे केंद्रातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेला इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड कंपनीकडून ३ लाख रुपये किमतीचे २० टॅब मिळाले आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्रीम. जपकर व श्रीम. मोरे मॅडम यांनी टॅब स्वीकारले.

यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, लेखाधिकारी रमेश कासार, उपशिक्षणाधिकारी शिवगुंडे, उपशिक्षणाधिकारी घोडके, शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी इफोसिस स्प्रिंग बोर्ड कंपनीने दिलेले टॅब कौशल्य आणि तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वरदानच ठरतील, असे वक्तव्य कासार साहेब लेखाधिकारी वित्त विभाग यांनी केले. शाळेला टॅब मिळण्यासाठी शाळेच्या पदवीधर शिक्षिका मोरे मॅडम यांनी वारंवार पाठपुरावा केला.

गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबची किती आवश्यकता आहे याचे महत्व त्यांनी पटवून दिले असता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून शाळेस २० टॅब मिळाल्याने विदयार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गावातील पालकांनी आपल्याला पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी विदयार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत ऍडमिशन घेण्यासाचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!