अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील आदर्श जिल्हा परिषद शाळा वत्सलानगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी (दि.२१) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.संमेलनाचे उद्घाटन ज्याचे सरपंच रामचंद्र आलुरे व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरोदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ए पी आय आनंद कांगुने, ग्रामपंचायत सदस्य धनराज मुळे, बालाजी घुगे, गणेश सूर्यवंशी, जयश्री व्हटकर, साहेबराव घुगे, सुजाता चव्हाण, मलंग शेख,उद्योजक लक्ष्मण चौगुले, संतोष मुळे, गौतम बनसोडे, आर एस गायकवाड, जावेद शेख, बी के कांबळे, चेअरमन सुनील सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पोवाडा, लोकगीत, लावणी, भारुड, योगा डान्स, हिंदी मराठी रिमिक्स गाण्यावरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तर बंजारा समाज नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी तीनशे विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला.यावेळी बोलताना रामचंद्र आलुरे म्हणाले की, वत्सलानगर हा वस्तीचा भाग असला तरी अणदूर गावापेक्षा मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक सुविधा या भागांमध्ये निर्माण झाले आहेत.या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचा आपणास अभिमान असल्याचे सांगू पुढील काळात ग्रामपंचायतच्या वतीने शाळेस सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा दराडे,सुभाष स्वामी,बाबुराव पांचाळ, भीमराव घोडके, वैशाली आडम शिवदास भागवत,दत्ता आरदवाड,विवेकानंद खलाटे,श्रीधर गिरी,पल्लवी लंगडे,गणेश नन्नवरे,वैजयंती बोंगरगे,काजल भालेराव यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुरेखा दराडे यांनी.सूत्रसंचालन श्रीधर गिरी तर आभार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ लंगडे यांनी मानले.नवोदय विद्यालय प्रवेश वर्ग, शिष्यवृत्ती जादा तासिका व इतर स्पर्धा परीक्षा या मध्ये तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थी निवड झाल्या बद्दल जनसेवा मित्र मंडळ व न्यू इंडिया गणेश मंडळच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्या जयश्री व्हटकर,बाबू नदाफ,उस्मान नदाफ,संपत वाघे, प्रभाकर गाढवे,संतोष व्हटकर,संतोष चव्हाण,सुनील भोळे,शुभम गाढवे, श्रद्धा दुपारगुडे यांनी पुढाकार घेतला.
Leave a reply