Disha Shakti

राजकीय

9 ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा-श्री.सुरेशराव लांबे पाटील

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / जावेद शेख : शेतकरी,शेतमजुर, विधवा निराधार महिला, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नोकरी,दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर दुपारी 1 वाजता भव्य महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.तरी राहुरी तालुका व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील बहुजन समाजातील शेतकरी,

शेतमजुर,दिव्यांग,बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने हजर राहावे शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील पुढे बोलताना म्हणाले 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून लोकनायक माजी राज्यमंत्री आ.बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या मोर्चाला पाठींबा देन्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन दोन ते तीन लाख बहुजन समाजातील शेतकरी शेतमजूर दिव्यांग बंधू विधवा निराधार परितक्ता महिला मोर्चामध्ये सामील होनार असुन त्या मोर्चाला पाठींबा देन्यासाठी

राहुरी तालुक्यातुन अंदाजे 101 गाड्या स्वखर्चाने घेऊन विवीध मान्य करन्यासाठी निघणार आहे,त्यामंधे दिव्यांगांच्या मानधनात वाढ करून ते 6000 हजार रुपये करावे, विना आट घरकुल देण्यात यावें भूमिहीन दिव्यांगांना २०० स्क्वेअर फुट सरकारी जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावी,यासह शेतकरी शेतमजूर यांच्या पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे MRGS रोजगार हमी योजनेमार्फत करने,नव्याने युवा धोरण व बेरोजगार युवकांसाठी किमान 5000 कोटींची तरतूद करणे,पेपर फुटी प्रतिबंध कायदा बनविणे,शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र्य आर्थिक विकास महामंडळ तयार करणे, कांद्याला हमीभाव देण्यात यावा व कांदा निर्यात बंदी व दुधाच्या भावा संदर्भात ठाम धोरण करावे,

घरकुलांसाठी 5 लाख रुपये व शहर व ग्रामीण भागात समान निधी असावा, शिक्षण आणि आरोग्य सेवेमंध्ये विषमता हटवून समानता आणावी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतीसाठी एकरी एक लाख बिगरव्याजी कर्ज कायमस्वरूपी मिळावे असे विविध प्रलंबित मागण्यासाठी राहुरी तालुक्यासह राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील, उपअध्यक्ष युनुस देशमुख,संघटक प्रशांत पवार,शहरअध्यक्ष विक्रमकुमार गाढे,युवाअध्यक्ष रुषीकेष ईरुळे यांनी केले,


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!