Disha Shakti

क्राईम

पाचेगाव येथे अज्ञात व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून, रक्ताच्या थारोळ्यात आढळला ३५ वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदे

Spread the love

दिशाशक्ती विशेष / इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात लाख कॅनॉलनजीक असलेल्या शेतात एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १६) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. पाचेगाव येथील शेतकरी कचरू पडोळ हे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता गिनी गवत कापण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी अंदाजे ३५ वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. ही माहिती त्यांनी स्थानिक पोलिस पाटलांना दिली.

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या अज्ञात व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गावातील महिला मजुरांनी पाचेगाव ते पाचेगाव फाटा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा खून झालेल्या अवस्थेत पाहिला. त्यानंतर याची सर्व गावात चर्चा होऊन घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. अज्ञात व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याचे निष्पन्न झाले.

घटनास्थळी नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक विजय बोभे, मनोज आहेर, विकास पाटील व पोलीस नाईक ढमाळे यांनी येऊन अज्ञात व्यक्तीच्या प्रेताची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला.तसेच पुढील पंचनामा करण्यासाठी नेवासा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन पाठविण्यात आला आहे. खून झालेल्या अज्ञात व्यक्तीचे वय ३५ वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तसेच अंगावर टी शर्ट, जीन्स पॅन्ट व उजव्या हातावर महाकाल देवाचा फोटो गोदलेले आहे. त्यामुळे खून झालेला व्यक्ती कोण व खून कोणी व कशासाठी केला हे पोलिसांसमोर आव्हान आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!