पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : समता विद्यालय तिखोल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गावामधून प्रभात फेरी काढून घरोघरी तिरंगा हा संदेश देण्यात आला गावातील जेष्ठ नागरिक तसेच माजी सैनिक विश्वनाथ मंचरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त गावातील सर्व गावकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीते शाळेतील मुलांनी सादर केली. यावेळी गावातील माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, वि.का.सो. चे चेअरमन, व्हा.चेअरमन सर्व कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच समता विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय पांडुरंग बर्वे सर, ज्येष्ठ शिक्षक झावरे सर, भोबाळ सर, मोरे सर, श्रीमती. संगीता ठाणगे मॅडम, शाळेचे नाईक श्री. भाऊसाहेब रोहकले मामा, श्री.भानुदास ठाणगे मामा. यावेळी उपस्थित होते.
भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता विद्यालय तिखोल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

0Share
Leave a reply