Disha Shakti

सामाजिक

स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी /  प्रवीण वाघमोडे : बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचे बंध घट्ट करण्यासाठी प्रेमरूपी धागा म्हणजे रक्षाबंधनाचा कार्यक्रम या रक्षाबंधनासाठी प्रत्येक बहीण व भावाला असे वाटत असते की रक्षाबंधना दिवशी मी व माझी बहीण एकत्र असावे पण काही वेळा जबाबदारीचे वजने किंवा अन्य काही कारणास्तव बहिण भाऊ एकत्र येऊ शकत नसतात उदाहरणार्थ पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांची ड्युटी असल्यामुळे ते बहिणीकडे जाऊ शकत नाही किंवा बहिण घरी आली तरी घरी जाऊन रक्षाबंधन साजरा करू शकत नाही.

याप्रमाणेच हॉस्पिटलमध्ये काही कारणास्तव उपचार घेत असलेले रुग्ण रक्षाबंधनानिमित्त घरी जाऊ शकत नसतात अशा या लोकांबरोबर व अधिकाऱ्यांबरोबर सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी गाईच्या शेणापासून तयार केलेली राखी बांधून स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी अध्यक्ष सुरज सोट पाटील सचिव धिरज सोट पाटील खजिनदार सोनाली चोपडे समन्वयक शामल सोट पाटील उपस्थित होते.यावेळी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे साहेब पोलीस उपनिरीक्षक धनवडे साहेब व पोलीस शिपाई तसेच भिगवन आय.सी. यु. चे डॉक्टर वल्लभ वेदपाठक इतर डॉक्टर व त्यांचा स्टाफ व यावेळी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले सर्व रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांच्याबरोबर रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करत त्यांना प्रोत्साहन दिले तसेच त्याबरोबर यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील सचिव धिरज सोट पाटील खजिनदार सोनाली चोपडे समन्वयक शामल सोट पाटील यांनी असे सांगितले की येणाऱ्या पुढील काळात असे समाज उपयोगी व समाजाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आमच्या संस्थेमार्फत केले जाणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!