राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : ‘तू मला आवडते, तू माझ्याशी बोलत जा, नाहीतर मी तुझ्या भावासह आई – वडीलांना मारून टाकेल,’ अशी धमकी देत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरुन तिचा विनयभंग करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. ही घटना तालुक्यातील एका गावात १७ डिसेंबर रोजी घडली. अल्पवयीन मुलगी इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती घरापासून शाळेपर्यंत सायकलवरुन ये-जा करते. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजे दरम्यान पिडीत मुलगी सायकलवर घरी जात असताना सात्रळ परिसरातील पाटाजवळ दिगंबर शेडगे याने तिला रस्त्यावर अडविले. तिचा हात धरुन, तिला लज्जा उत्पन्न होईल, असे त्याने गैरवर्तन करीत धमकी दिली. पिडीत मुलीने त्याच्या हाताला झटका मारुन घरी आली.
हा प्रकार तिने आई वडिलास सांगितला. पिडीतीचे आई वडील त्य तरुणाच्या घरी समजावण्यासाठी गेले असता, दिगंबर शेडगे याने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करुन, जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतेच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिगंबर संजय शेडगे (रा. कानडगाव, ता. राहुरी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.
राहुरीतील सात्रळ येथे शाळकरी मुलीला रस्त्यात अडवून तू मला आवडते, तू माझ्याशी बोलत जा म्हणत विद्यार्थिनीचा विनयभंग

0Share
Leave a reply